Breking News
Pune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमक

Pune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबार

Pune Crime News

पुण्यातील मांजरी बुद्रूकमधील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : रस्त्याने पायी चालताना धक्का लागल्यामुळे झालेल्या वादातून एकाने तरुणावर पिस्तूलातून गोळीबार करुन गंभीररित्या जखमी केले. त्याच्या अंगावर दोन राउंड फायर करत संबंधिताने परिसरात दहशत माजवली आहे. ही घटना २४ नोव्हेंबरला रात्री पावणे आठच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरातील अक्षय बारच्या बाजूला घडली. याप्रकरणी कोलवडी ता. हवेली परिसरात राहणार्‍या १८ वर्षीय तरुणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा कोलवडीतील मदने वस्तीवर राहायला आहे. २४ नोव्हेंबरला तो मांजरी बुद्रूक परिसरात आला होता. त्यावेळी रस्त्याने जाताना त्याचा एकाला धक्का लागला. त्यामुळे त्यांच्या वाद सुरु झाला. त्याच रागातून संबंधिताने पिस्तूलातून दोन राउंड फायर केले. तरूणाला गंभीररित्या जखमी केल्यानंतर आरोपी पसार झाला. याची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करत आहेत.

मुंढव्यात दुचाकीस्वारांनी कोयते नाचवले

Pune Crime News : शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवले निघाले असताना, मुंढव्यातील केशवनगरात दुचाकीस्वार टोळक्याने कोयते नाचवल्याची घटना घडली आहे. ही घटना २३ नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास केशवनगरातील नदीपात्रात घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, टोळक्याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार स्वप्नील रासकर यांनी मुंढवा ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार टोळक्याने हातात कोयते घेडन आरडाओरड केली. ही घटना २३ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण होण्याच्या उद्देशाने टोळक्याने कोयते नाचवले असून, याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज नुसार आरोपींचा माग काढला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक उगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×