Breking News
Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’

Pune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

Pune Cyber Crime News

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला ऑनलाईनरित्या तब्बल ११ लाख ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ कालावधीत धनकवडीत घडली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय जेष्ठाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाइल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, धनकवडी परिसरात राहायला आहेत. १९ नोव्हेंबरला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क केला. मी पोलीस असून, तुमच्या बँकखात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असल्याची बतावणी केली. Pune Cyber Crime News तुमचे बँंक खाते तपासणीला द्यावे लागेल, असे सांगून संबंधिताने जेष्ठाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांना ११ लाख ५० हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करत आहेत.

हडपसर मध्ये घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना १८ ते १९ नोव्हेंबरला हडपसरमध्ये घडली असून, जेष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसर परिसरात राहायला असून, १८ ते १९ नोव्हेंबरला ते घर बंद करुन बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. गावाहून आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×