Breking News
Pune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान

Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळे

Baburao Shewale Hospital

बाबुराव शेवाळे दवाखान्यात कॅन्सर डायग्नोस्टिक सपोर्ट सेंटरचे भूमिपूजन

marathinews24.com

पुणे – Baburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी आत्मीयतेने, नियोजनपूर्वक आणि जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा सर्वांगीण कायापालट करणे शक्य आहे. औंध-बोपोडी परिसरातील लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करून याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे, असे कौतुकोद्गार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काढले.

Baburao Shewale Hospital
Baburao Shewale Hospital

संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

बाबुराव शेवाळे दवाखान्यात उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर डायग्नोस्टिक सपोर्ट सेंटरचे भूमिपूजन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, भक्ती गायकवाड, आरोग्य अधिकारी मीना बोराडे, डॉ. झिम्रा इस्राएल, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, प्रियांका मेहरा, विलास जाधव यांच्यासह महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

औंध-बोपोडी परिसरातील तीन रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल शिरोळे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष कौतुक केले. तसेच परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता येथे ट्रॉमा सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व नगरसेवकांनी सामूहिक नेतृत्व आणि समन्वयातून विकासकामे हाती घेतल्यामुळे परिसराचा कायापालट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिसरात नियोजित कॅन्सर डायग्नोस्टिक सपोर्ट सेंटरमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले. परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, Pune Cyber Crime News  जागतिक दर्जाचे हॉकी स्टेडियम यांसह विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. प्रभागातील विकासकामांसाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात कर्करोगाचे निदान आणि उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे डॉ. झिम्रा इस्राएल यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेऊन अकारण आक्रमक भूमिका न घेता समन्वयातूनही उत्तम काम करता येते, हे औंध-बोपोडीतील नगरसेवकांनी दाखवून दिले आहे, असे आरोग्य अधिकारी मीना बोराडे यांनी सांगितले. सर्व नगरसेवकांच्या सहकार्यामुळे प्रभागात रुग्णसेवेचे काम प्रभावीपणे राबविता येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्वर जावीर यांनी केले तर माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×