Breking News
Census 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Pune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले

Pune PG Hostel Action

गोदामांवर अग्निशमनचा बडगा

marathinews24.com

पुणे – शहरातील अनधिकृत पीजी हॉस्टेल (Pune PG Hostel Action) तसेच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या भंगार गोदामांविरोधात पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत वडगाव बुद्रुक, नर्हे आणि धायरी परिसरातील १३ पीजी व हॉस्टेल आणि सात भंगार गोदामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळ – सविस्तर बातमी 

मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने, अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर आणि बांधकाम विभागाचे अभियंता विश्वजीत वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. अनेक पीजी (Pune PG Hostel Action) आणि हॉस्टेलमध्ये अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तसेच योग्य विद्युत व्यवस्था नसल्याचे आढळले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. रहिवासी भागातील पत्र्याच्या शेडमध्ये प्लास्टिक, स्टील, लोखंड, कागद आणि पोती यांसारख्या ज्वलनशील वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले. काही ठिकाणी भंगार साठवणुकीसोबतच त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे आढळले.

परवानग्यांकडेही कानाडोळा

बीडीपी झोनमधील जागांचा वापर, अरुंद रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, कर आकारणी तसेच अधिकृत वीजपुरवठ्याबाबत आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचे तपासणीत आढळले. अनेक ठिकाणी संपूर्ण इमारती किंवा जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, जागामालकांकडून तेथे सुरू असलेल्या व्यवसायावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

गुन्हे दाखल करण्याचे आदेश

नियमांचे उल्लंघन करून तसेच आवश्यक परवानग्या न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करून त्या तात्काळ सील करण्याचे निर्देश आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशा आस्थापनांवर महापालिका आणि अग्निशमन दलाची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

कारवाई सुरूच राहणार

(Pune PG Hostel Action)  बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांसह आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याने जागामालकांविरुध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अग्निसुरक्षेचे नियम आणि आवश्यक परवानग्यांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांची तपासणी मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्‍याने अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×