संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प; प्रबोधनासाठी संविधानाचा पर्याय स्वीकारण्याचेमत
marathinews24.com
पुणे – Shiv Sena Bhavan Pune News : भारतीय संविधान दिनानिमित्त शिवसेना भवन, पुणे येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.सोनाली लांडगे यांनी घटनेच्या ऊद्देशिकेचे वाचन केले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असून, संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रत्येक नागरिकाच्या जीवनात रुजणे आवश्यक आहे. संविधानिक मूल्यांचे जतन करून ती समाजात प्रबोधन अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना – सविस्तर बातमी
Shiv Sena Bhavan Pune News यावेळी मार्गदर्शन करताना डॅा.नीलम गोर्हे म्हणाल्या की हिंदूह्रदयसम्राट मा. ठाकरे यांचे मत होते की न्यायालयात साक्ष देताना किंवा शपथ घेताना धार्मिक ग्रंथांची शपथ घेण्याऐवजी भारतीय संविधानाची शपथ घेण्याची पद्धत घेण्यात यायला हवी मत मांडले. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असून संविधान हे सर्व नागरिकांसाठी समान आणि सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक व प्रबोधनाचे माध्यम आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन पूजा रावेतकर- महिला संपर्कप्रमुख पुणे शहर, शिवसेना कार्यालय सचिव संदिप शिॅदे सुधीर कुरुमकर-शिवसेना कामगार सेना, यांनी केले होते व ऊपस्थितात एकनाथ ढोले, मीनल धनवटे, गायत्री भागवत, सोनाली लांडगे, अक्षता धुमाळ, महेंद्र जोशी, मिलिंद आहिर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















