Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये राष्ट्र प्रथमला सर्वोच्च प्राधान्य – चंद्रकांतदादा पाटील, प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल – धीरज घाटे

marathinews24.com

पुणे – पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते तिघांचाही पक्षप्रवेश झाला.

रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट, पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे -सविस्तर बातमी 

यावेळी आमदार हेमंत रासने, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सुपेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप नेते प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, लहु बालवडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला जातो. स्वतःचे हित बाजूला ठेवून राष्ट्र प्रथमला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.”

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा आनंद असून, त्यांचा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.”

प्रल्हाद गवळी हे मनसेच्या पुणे शहरातील पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रमोद निम्हण हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. तर डॉ. वैष्णवी किरड यादेखील शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत्या. या तिघांच्या भाजप प्रवेशामुळे पुण्यातील पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×