Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

महिलाेसह दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा

marathinews24.com

पुणे – Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत ओैषध वितरकाने फिर्याद दिली आहे.

वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय ओैषध वितरक हे लष्कर भागात राहायला आहे. आरोपी महिला आणि साथीदार यांचे ओैषध विक्रीचे दुकान आहे. आरोपी हे ओैषध विक्रेत्याचे ओळखीचे आहेत. आरोपींनी ओैषध वितरकाकडून ६२ लाख ९९ हजार रुपयांची ओैषधे खरेदी केली होती. ओैषध खरेदी Medicine Fraud केल्यानंतर आरोपींनी वितरकाला पैसे दिले नाहीत. पैशांबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वितरकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विकास अडागळे तपास करत आहेत.

मोटारीच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू

मोटारीच्या चाकाखाली सापडून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी भागात घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नाना बाबूराव चव्हाण (वय ५४, रा. बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत चव्हाण यांचा मुलगा श्रवण (वय २६, रा. मांगडेवाडी, कात्रज) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना चव्हाण हे १८ सप्टेंबर रोजी बालेवाडीतील ममता चौकात रस्त्याच्या कडेला झोपले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटार चालक ममता चौकातून निघाला होता. ममता चौकातून मोटार मागे घेत असताना रस्त्याच्या कडेला झोपलेले जाधव हे चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक स्वाती लामखेडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×