सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – वाहतूक नियमभंग केल्याची लिंक पाठवून एकाची सायबर चोरट्यांनी २ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३४ वर्षीय तरुण नर्हे भागात राहायला आहे. सायबर (Pune Cyber Crime) चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवली. वाहतूक नियम भंगाची लिंक तरुणाने उघडली. त्यानंतर चोरट्यांनी मोबाइलचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून तरुणाच्या खात्यातून २ लाख ७९ हजार रुपये लांबविले. ही रक्कम दुसर्या एका खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. अनोळखी क्रमांकावर वाहतूक नियमभंगाचे चलन किंवा लिंक पाठविण्यात आल्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.























