Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Bibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला

Bibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला

बिबवेवाडीत तिघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – Bibwewadi Crime : कार मागे घेताना धडक होऊ नये म्हणून चालकाला गाडी थांबविण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला तिघांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर एकाने कानाखाली मारली, तर दुसऱ्याने बांधकामाची सिमेंटची वीट डोक्यात मारून त्याला जखमी केले. बिबवेवाडी परिसरात हा प्रकार घडला.

अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध – सविस्तर बातमी 

याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हर्ष हनुमंत पाटील (वय २०, रा. आईमाता मंदिराशेजारी, विश्वकर्मा मंदिराच्या मागे, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे (Bibwewadi Crime) तक्रार दिली आहे. त्यावरून अरबाज मुसा कुरेशी (वय १९, रा. एपी बेकरीजवळ, लोहियानगर), एका विधिसंघर्षित बालकासह मुंतजिर अल्ताफ शेख (वय २५, रा. काकडे वस्ती, मलिकनगर गल्ली क्रमांक २, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसल्याचे नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबरला रात्री पाचच्या सुमारास आईमाता मंदिराजवळील सरताज टेलरच्या दुकानासमोरील गल्लीत हा प्रकार घडला. पाटील हे त्यांचा मित्र कुणाल प्रभुदयाल पारधी याच्यासोबत दुचाकीवरून जात होते. त्यावेळी काळ्या रंगाची कार रिव्हर्स येत होती. कारचा धक्का लागू नये म्हणून पाटील यांच्या मित्राने ब्रेक दाबून गाडी थांबविली. कार थांबल्यानंतर कारचालकाने त्यांना, “अरे मागे वळून गाडी चालव, मी आता पडतो असतो,” असे म्हणत वाद घातला. त्यावर आरोपी अरबाजने पाटील यांना “तुला माहिती आहे का गाडी कोणाची आहे?” तसेच “ही भाईची गाडी आहे, तू भाईला नाही ओळखत का?” असे म्हणत जाब विचारला.

यानंतर तिसरा आरोपी कारमधून खाली उतरला. त्याने आणि विधिसंघर्षित बालकाने पाटील व त्यांच्या मित्राला धक्काबुक्की केली. त्यावेळी अरबाजने पाटील यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर आरोपींनी तेथे पडलेली सिमेंटची वीट उचलली आणि ती पाटील यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. (Bibwewadi Crime)  हल्ल्यानंतर आरोपींनी “अब्दुल भाई को बुलाव, इसको गाडी में डाल के लेके जाते है,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर पाटील यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×