रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची मागणी; राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा
marathinews24.com
पुणे – औषधांच्या किमतीतील पारदर्शकता, रुग्णालयीन बिलांचे शासकीय लेखापरीक्षण आणि रुग्णांच्या आर्थिक हक्कांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. Medicine Safety Law तीन महिMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट करान्यांच्या मुदतीत औषध सुरक्षा कायदा लागू झाला नाही, तर तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सचिव डॉ. स्वानंद पंडित, पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे-साठ्ये, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागत – सविस्तर बातमी
उमेश चव्हाण म्हणाले, “रुग्णालयातील वाढता उपचार खर्च, महागडी औषधे तसेच विविध शुल्कांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवत आहे. अनेकदा रुग्णालयांकडून आपल्याच रुग्णालयातील फार्मसीमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या औषधांची किंमत खूप जास्त असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांवर आर्थिक ताण येतो. त्यामुळे जीवनावश्यक व जीवनरक्षक औषधांची उपलब्धता आणि किमतीतील पारदर्शकतेसाठी स्वतंत्र ‘औषध सुरक्षा कायदा’ करावा, अशी मागणी परिषदेतर्फे आम्ही करत आहोत. हा कायदा फौजदारी संहितेचा असावा आणि संबंधितांना त्याअंतर्गत दंड, कठोर शिक्षा आणि वेळप्रसीगी अटक व्हायला हवी. औषधांची खरेदी किंमत, छापील कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) आणि अंतिम विक्री किंमत याबाबत पारदर्शकता वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले.
Medicine Safety Law याबरोबरच जनरल वॉर्डसह आयसीयू, विशेष कक्ष आणि अन्य विभागांतील रुग्णालयीन बिलांचे नियमित शासकीय ऑडिट करावे. यामध्ये नियमबाह्य आकारणी आढळल्यास संबंधित रुग्णाला अतिरिक्त रक्कम परत करण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक रुग्णाला औषधे, तपासण्या, प्रक्रिया, बेड व डॉक्टरांच्या शुल्कासह तपशीलवार बिल देणे बंधनकारक करावे. तसेच धर्मादाय रुग्णालयांचे नियमित सोशल ऑडिट करून मोफत व सवलतीच्या खाटांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली. शासनाने येत्या ३० दिवसांत य़ाबाबतचा ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.






















