Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Morya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाचे १३४ वे वर्षे

marathinews24.com

पुणे – श्री मोरया गोसावी (Morya Gosavi Palkhi) यांनी भाद्रपद महिन्यातील मोरगावला सुरु केलली पालखी परंपरा परतीच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात दरवर्षी येते. यावर्षी देखील पायी पालखी सोहळा करुन उत्सव मंडपात आलेल्या पालखीचे स्वागत व आरती श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या विश्वस्त व पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्या विश्वस्तांनी श्री दगडूशेठ गणपतीची देखील आरती केली.

‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे उत्सवाच्या १३४ व्या वर्षी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे आलेल्या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, विनायक रासने, सचिन आखाडे यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

श्री मोरया गोसावी (Morya Gosavi Palkhi) विनायकी चतुर्थी ला मोरगावला जात असत. एकदा विनायकी चतुर्थीला गेले असताना मयुरेश्वराने त्यांना दृष्टांत दिला की आता तू वृद्ध झाला आहेस, तुझे कष्ट पाहवत नाहीत. त्यामुळे मीच तुझ्या घरी येईन. त्या दृष्टांताप्रमाणे चिंचवडमधील गणेश कुंडामध्ये क-हा नदीच्या तीरी मयूरेश्वराची मूर्ती सापडेल, असे सांगितले. त्याप्रमाणे प्रति मयुरेश्वर रुपाची मूर्ती सापडली. श्री मोरया गोसावी यांनी ती मूर्ती चिंचवडमधील मंगलमूर्ती वाडयात स्थापन केली.

तेव्हापासून दर माघ व भाद्रपद महिन्यात श्री मंगलमूर्ती (प्रति मयुरेश्वर) पालखीतून मोरगावला श्री मयुरेश्वराच्या भेटीला जाते. ही पालखी चिंचवड ते मोरगाव अशी माघ महिन्यात रथातून आणि भाद्रपद महिन्यात युवा कार्यकर्ते खांद्यावर पालखी घेऊन जातात. या दोन्ही वेळेला मोरगावला दिवाळीसारखे वातावरण असते. दर तृतीयेला पालखी मोरगावला पोहोचते. तेथे चतुर्थीला पूजा, आवर्तने, छबिना, पंचमीला अन्नदान असे कार्यक्रम झाल्यावर षष्टीला पालखी परतीच्या प्रवासाला निघते.

त्यानंतर पुण्यात श्री दगडूशेठ गणपती मांडवात आल्यावर दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त व व्यवस्थापनामार्फत पालखीचे स्वागत व आरती केली जाते. तर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव हे श्री दगडूशेठ गणपतीची आरती करतात. हा सोहळा अनुभविण्यासारखा असतो. मोरगावला जाताना श्री कसबा गणपतीला देखील पालखीचे स्वागत होते आणि परतीच्या प्रवासात शेवटी ‘दगडूशेठ’ गणपतीला पालखी येते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×