Breking News
Pashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळे

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शन

LokSamvad 2026

‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

बारामती – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ (LokSamvad 2026) अन्वये महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी प्रक्रियेबाबत महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने ऑनलाइन नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांनी केले.

सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रम – सविस्तर बातमी 

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ (LokSamvad 2026) उपक्रमांतर्गत भैरवनाथ मित्र मंडळ, रुई तसेच श्री सिद्धी गणेश मंडळ, बारामती येथे आयोजित संवाद कार्यक्रमात  जाधव यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. महिला शेतकऱ्यांचा फॉर्मर आयडी काढणे, त्याची नोंदणी करणे तसेच पोर्टलवर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थित महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली.

शेती आणि शेतीपूरक कामांमध्ये योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी, यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ (LokSamvad 2026) लागू करण्यात आला आहे. जमिनीची मालकी नसली तरी शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. यामध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग करणाऱ्या महिलांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे  जाधव यांनी सांगितले.

पोर्टलवर अर्ज करताना आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी, वैयक्तिक माहिती भरणे, शेतीविषयक तपशील नोंदविणे तसेच फॉर्मर आयडी जोडण्याची प्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अर्जातील माहिती अचूक भरूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले.

‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी आवश्यक ऑनलाइन प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेता आली. मार्गदर्शनाला महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×