Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गुलटेकडी मार्केट यार्डमधील श्री शारदा गजानन मंडळाचा अभिनव देखावा; सामाजिक उपक्रमांची परंपराही कायम

marathinews24.com

पुणे – पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा लाभली असून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक संदेश देणारे विविध देखावे हे या उत्सवाचे खास आकर्षण ठरत आले आहेत. यंदा गुलटेकडी येथील मार्केट यार्डमधील (Market Yard Ganeshotsav) श्री शारदा गजानन मंडळाने विविध प्रकारची फळे, भाजीपाला, पालेभाज्या आणि कंदमुळे वापरून गणरायाची आकर्षक आरास साकारली आहे.

रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोड – सविस्तर बातमी 

मार्केट यार्ड हे पुण्यातील फळे आणि भाजीपाल्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र. याच परिसराची ओळख अधोरेखित करत मंडळाने यंदाच्या सजावटीत भाजीपाल्याचा कल्पकतेने वापर केला आहे. (Market Yard Ganeshotsav) विविध पालेभाज्या, मुळा, गाजर, मिरची, वांगी, टोमॅटो, काकडी, भोपळा तसेच अन्य फळे आणि कंदमुळांची कलात्मक मांडणी करत गणरायाचा परिसर सजविण्यात आला आहे. त्यामुळे ही आरास भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

‘बळीराजाच्या कष्टातून आपल्या ताटात पोहोचणाऱ्या शेतमालाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि शेतकरी, व्यापारी, कामगार व ग्राहक यांच्यातील नाते अधोरेखित व्हावे,’ असा संदेश या आरासीतून देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

श्री शारदा गजानन मंडळाने यापूर्वीही गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळाने दूरदृष्टी दाखवत टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला होता. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि विविध सामाजिक प्रबोधनपर उपक्रमही मंडळातर्फे राबविण्यात येतात.

Market Yard Ganeshotsav मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी, माथाडी कामगार आणि नागरिकांना एकत्र आणत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्याचे काम मंडळ सातत्याने करत आहे. परंपरा, पर्यावरण, शेती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारी यंदाची भाजीपाल्याची आरास पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×