Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

LokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोड

LokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे - डॉ. विद्या राठोड

‘लोकसंवाद २०२६’च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात रक्तदानाबाबत जनजागृती

marathinews24.com

पुणे – LokSamvad 2026 : रक्तदान हे एक अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दान मानले जाते. एका व्यक्तीने केलेले रक्तदान किमान तीन लोकांचे प्राण वाचवू शकते. रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णालाच जीवदान मिळत नाही, तर रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन डॉ.विद्या राठोड यांनी केले.

‘Bappa.org’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात (LokSamvad 2026) श्री अष्टविनायक मित्र मंडळ, माजी सैनिक नगर येरवडा,येथे ब्लड बँकेच्या डॉ. विद्या राठोड यांनी रक्तदानाबाबतचे महत्व सांगितले.

डॉ. राठोड पुढे म्हणाल्या, शरीरात लोहाचे प्रमाण जास्त झाल्याने ह्दयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. नियमित रक्तदान केल्यामुळे शरिरातील अतिरिक्त लोह बाहेर पडते आणि रक्ताची जाडी कमी होऊन ह्दयाचे आरोग्य उत्तम राहाते. तसेच रक्तदान केल्यानंतर शरीरात बाहेर गेलेले रक्त भरुन काढण्यासाठी शरीर लगेच कार्यरत होते. यामुळे अस्थिमज्जेला उत्तेजना मिळते आणि शरीरात नवीन, निरोगी लाल रक्तपेशी तयार होतात.

LokSamvad 2026  रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांकडून दात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी, रक्तदाब, नाडीचा वेग आणि वजन तपासले जाते. तसेच रक्ताची एचआयव्ही, हिपॅटायटीस आणि मलेरिया सारख्या आजारांसाठी मोफत चाचणी केली जाते. ज्यामुळे आरोग्याची स्थिती समजते. शरीरात लोहाचे प्रमाण नियंत्रित राहिल्यामुळे लिव्हर फुफ्फुस आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

डॉक्टर राठोड यांनी रक्तदानाचे हे दुहेरी महत्व सांगून या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहनही केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमकार ढाणे, उपाध्यक्ष ओमकार नायर, कार्याध्यक्ष पियुष गायचोर, इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×