Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Women Health Baramati : स्त्री ही कुटुंबाचा आधार; तिने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक- डॉ. शुभांगी वाघमोडे

https://marathinews24.com/pimpri-chinchwad-loksamvad/

लोकसंवाद कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती

marathinews24.com

बारामती – स्त्री ही कुटुंबाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेताना तिने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, स्वतःच्या आरोग्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आवश्यक वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा, (Women Health Baramati) असे आवाहन आरोग्यविषयक मार्गदर्शनातून करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रम; शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासोबतच शहराच्या विकासात नागरिकांनी सहभाग नोंदवावा – सविस्तर बातमी 

माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात अनंत युवा प्रतिष्ठान, सूर्यनगरी,विठ्ठल नगर गणेश मंडळ, रुईपाटी आणि अहिल्या गणेश मंडळ, हरी कृपा नगर, (Women Health Baramati) बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. शुभांगी वाघमोडे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करताना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.

रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता आणि तपासणी, तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी (Cervical Cancer) स्क्रीनिंग करण्याचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे आणि दैनंदिन जीवनात सक्रिय राहण्याचा सल्ला देण्यात आला.कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्रीचे आरोग्य उत्तम राहिल्यास संपूर्ण कुटुंबाचे (Women Health Baramati) आरोग्य आणि जीवनमानही अधिक चांगले राहते. त्यामुळे “स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थाची गोष्ट नसून कुटुंबासाठीची जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

२४ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या लोकसंवाद उपक्रमात विविध शासकीय विभागांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×