Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रम

Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रम

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासोबतच शहराच्या विकासात नागरिकांनी सहभाग नोंदवावा; ‘लोकसंवाद’ उपक्रमात विशेष कार्य अधिकारी किरण गायकवाड यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शहराच्या सर्वांगीण विकासात नागरिकांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे. महानगरपालिका, (Pimpri Chinchwad LokSamvad) राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन पात्र नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच शहराच्या विकास आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट करा – सविस्तर बातमी 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ अंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने Pimpri Chinchwad LokSamvad  आयोजित लोकसंवाद उपक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर

राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाज कल्याण विभागामार्फत महिलांसाठीच्या योजना, निराधार नागरिकांसाठीच्या योजना तसेच शैक्षणिक योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी योजनांचा प्रचार प्रसार करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या योजनांचा महानगरपालिकेच्या उपक्रमांमध्ये समावेश करून त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनांची माहिती व त्यांचे लाभही पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध विभागाच्या तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध योजना आणि उपक्रमांची माहिती उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सांस्कृतिक उपक्रमांमध्येही नागरिकांचा सहभाग आवश्यक

शहराचे वैभव केवळ भौतिक विकासातून नव्हे, तर सांस्कृतिक समृद्धीतूनही निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही नागरिक, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘सारथी’ ॲपवर समस्या नोंदविण्याचे आवाहन

नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेचे ‘सारथी’ ॲप उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या समस्या या ॲपवर नोंदवाव्यात, जेणेकरून त्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करता येईल, असेही आवाहन करण्यात आले.

यावेळी गझल गायक अशोक गायकवाड यांनी नागरिकांना Pimpri Chinchwad LokSamvad लोकसंवाद उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी लोकसंवाद उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संयोजन उपसंपादक संदीप राठोड, जितेंद्र खंडागळे आणि विशाल तामसीकर यांनी केले. कार्यक्रमास महिला, युवक, युवती तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×