सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीत भटक्या श्वानाला गजाने मारहाण
marathinews24.com
पुणे – भटक्या श्वानाला गजाने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू (Sadashiv Peth Dog Death) झाल्याची घटना सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनीत घडली. याबाबत प्राणिप्रेमी संस्थेतील स्वयंसेवक महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका सफाई कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडली – सविस्तर बातमी
Sadashiv Peth Dog Death पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी परिसरात १६ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास भटक्या श्वानाला एका सफाई कर्मचाऱ्याने गजाने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती प्राणिप्रेमी स्वयंसेवी संस्थेतील महिला स्वयंसेवकाला मिळाल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांत तक्रार दिली. हवालदार वागलगावे तपास करत आहेत.






















