Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Sports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

Sports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे प्रतिपादन

marathinews24.com

पुणे –  ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत विश्वज्योत मित्र गणपती मंडळ, नारायण पेठ आणि विजयी मारुती मंडळ ट्रस्ट, शनिवार पेठ येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी विद्यार्थी, युवक व खेळाडूंसाठी क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. क्रीडांगण विकास, व्यायामशाळा विकास, युवा पुरस्कार, युवा महोत्सव तसेच गुणवंत खेळाडूंसाठी विविध प्रोत्साहनपर योजनांचा (Sports Schemes Pune) लाभ घेऊन राज्यात अनेक क्रीडा पटू घडवू या असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘सारथी’च्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा – उप व्यवस्थापकीय संचालक अनिल पवार – सविस्तर बातमी 

यावेळी विश्वज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष विपुल इनामदार तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी क्रीडांगण विकास योजना (Sports Schemes Pune) आणि व्यायामशाळा विकास योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून युवकांना नियमित व्यायाम व क्रीडा सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

विद्यार्थी व तरुण युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविध कला प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना प्रमाणपत्रांसह रोख पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्यात येते. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा युवा पुरस्काराने गौरव करण्यात येतो.

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये गुणवंत खेळाडूंना अतिरिक्त गुणांची तरतूद आहे. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासन सेवेत पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे. तसेच एशियन, कॉमनवेल्थ आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या धोरणानुसार थेट नियुक्तीची तरतूद असल्याची माहिती लकडे यांनी दिली.

‘मिशन लक्षवेध’ योजनेंतर्गत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवास, भोजन, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ तसेच क्रीडा विज्ञानाशी संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा व महाविद्यालयांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.

विद्यार्थी व युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देऊन क्रीडा विभागाच्या विविध योजना (Sports Schemes Pune) व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. यावेळी सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सारथीचे अभय पालवणकर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×