Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

SARTHI Schemes Pune : ‘सारथी’च्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा – उप व्यवस्थापकीय संचालक अनिल पवार

SARTHI Schemes Pune

स्पर्धा परीक्षा, शिक्षण, कौशल्य विकास व कृषी क्षेत्रासाठी विविध उपक्रम

marathinews24.com

पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (SARTHI Schemes Pune) मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी व कुणबी या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण, कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रात विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांनी व लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी केले.

‘लोकसंवाद 2026 ‘ च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात आपले सरकार पोर्टल बाबत जनजागृती – सविस्तर बातमी 

विनायक मित्र मंडळ, भिडे पूल चौक येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सारथी संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती नागरिकांना दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पवन सुपेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण

(SARTHI Schemes Pune)  ची स्थापना २०१९ मध्ये झाली असून संस्थेमार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत सारथी संस्थेचे १४० विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून सुमारे १ हजार १२४ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.

देशांतर्गत व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देशातील आयआयटी, आयआयएम, एनआयटी यांसारख्या सुमारे २०० नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना दरवर्षी गुणानुक्रमे शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते, अशी माहिती पवार यांनी दिली.

कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रातही उपक्रम

इंडो-जर्मन टूल रूम, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) माध्यमातून कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

वसतिगृह व अभ्यासिकांचे काम प्रगतीपथावर

सारथी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील आठ विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रत्येकी ५०० मुलांसाठी व ५०० मुलींसाठी वसतिगृह तसेच वाचनालय आणि अभ्यासिकांच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

सारथीच्या योजना व उपक्रमांची (SARTHI Schemes Pune) अधिक माहिती मिळविण्यासाठी संस्थेचे संकेतस्थळ, मोबाईल ॲप, फेसबुक, व्हॉट्सॲप तसेच यूट्यूब वाहिनीला भेट द्यावी, असे आवाहनही पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,सारथीचे अभय पालवणकर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×