Breking News
Science on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना

Urban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृती

Urban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृती

‘शहरी गरीब आरोग्य योजने’चा नागरिकांनी लाभ घेण्याचे केले -आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद

marathinews24.com

पुणे – ‘लोकसंवाद-२०२६’ (Urban Poor Health Scheme) उपक्रमांतर्गत माती गणपती मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली. यामध्ये ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ महत्त्वाची असून या योजनेअंतर्गत विविध उपचारांसाठी योजनेचे कार्ड उपयोगी ठरते, अशी माहिती त्यांनी दिली.

क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या – जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे – सविस्तर बातमी 

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विविध आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

(Urban Poor Health Scheme) ‘शहरी गरीब आरोग्य योजने’अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध उपचारांसाठी आरोग्य कार्डाचा उपयोग करता येतो. त्यामुळे पात्र नागरिकांनी योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य निरीक्षक सय्यद यांनी केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून आरोग्यविषयक योजनांचीही जनजागृती करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. (Urban Poor Health Scheme) कार्यक्रमाला सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सारथीचे अभय पालवणकर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×