जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला
marathinews24.com
पुणे – जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जखमी झालेले जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या संपर्कात आहेत. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी, २७ जण ठार – सविस्तर बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री