आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणारा गजाआड, तांत्रिक तपास करुन काढला माग
marathinews24.com
पुणे – अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. तांत्रिक तपास करुन पोलिसांनी आरोपीचा माग काढला.किसन हनुमंत तोरडमल (वय २७, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चंदननगरमध्ये वसाहतीत आग; तब्बल ५० झोपड्या जळाल्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तोरडमल याने एका ओळखीतील मुलीची नकळत आक्षेपार्ह छायाचित्रे काढली होती. मोबाइलवरुन त्याने चित्रीकरण केले होते. त्याने छायाचित्रे, चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तोरडमल याला अटक केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, महावीर लोंढे, प्रकाश सावंत, सुनील आव्हाड यांनी ही कामगिरी केली. समाज माध्यमात ओळखीतील अल्पवयीन मुली, तसेच तरुणींची छायाचित्रे प्रसारित करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांना धमकावून गैरफायदा घेतला जातो. असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.