पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे सोन्याचे गंठण चोरले

गर्दीचा फायदा घेऊन लुटीचे सत्र कायम

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना २६ एप्रिलला सकाळी साडेअकराच्या सुमारास मोरेबाग बसस्टॉप कात्रज ते अरण्येश्वर चौक सहकारनगर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहणार्‍या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : तडीपार असताना कोयत्यासह फिरणाऱ्या सराईताला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहायला असून, २४ एप्रिलला कामानिमित्त पीएमपीएल बसने प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. अरण्येश्वर चौकात बसमधून खाली उतरताना महिलेला गळ्यात सोन्याचे गंठण दिसून आले नाही. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौैजदार बी. के. खुटवड तपास करीत आहेत.

पुण्यात बसप्रवासात चोरीच्या घडलेल्या घटना

बसने निगडी ते पुणे स्टेशन असा प्रवास करणार्‍या ३३ वर्षीय महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी तब्बल १ लाख १७ हजार रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १८ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास घडली असून, महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रूपीननगर तळवडे परिसरात राहायला असून, कामानिमित्त पीएमपीएल बसने १८ एप्रिलला प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. पर्समधील जवळपास सव्वा लाख रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पुणे स्टेशनवर उतरताच बंडगार्डन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.

जेष्ठ महिला स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकातून निगडीच्या दिशेने जाणार्‍य बसमध्ये शिरत असताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटलीवर डल्ला मारला आहे. महिलेच्या हातातील ५० हजार रूपये किंंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना ११ एप्रिलला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट स्थानकाजवळ घडली आहे. तक्रारदार ६६ वर्षीय जेष्ठ महिला बोपोडीत राहायला असून, कामानिमित्त स्वारगेटला आल्या होत्या. त्यानंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी गलका करीत गोंधळ केला. महिलेच्या हातातील सोन्याची पाटली काही सेंकदात कापून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कस्पडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×