सुरक्षा यंत्रणेतील कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न
marathinews24.com
पुणे – Pune Police Crime News : दारुच्या नशेत भरधाव मोटार घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या क्वीन्स गार्डन परिसरातील बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न एका पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील सुरक्षा यंत्रणेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली.
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा – सविस्तर बातमी
अमोल वसंतराव भिसे (वय ४२) याला अटक करण्यात आली. भिसे हा शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहे. त्याची मानसिक स्थिती ठिक नसून भिसेविरुद्ध त्याचा पत्नीने तक्रार दिली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे याने तीन विवाह केले आहेत. त्याच्या पत्नीने २०२५ मध्ये पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे निलंबन रद्द करण्यात आले. त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले.
भिसे याची शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणूक करण्यात आली. पोलीस मुख्यालायत नेमणूक केल्यानंतर तो अस्वस्थ झाला होता. मंगळवारी (३ नाेव्हेंबर) सायंकाळी तो दारू पिऊन तो पोलीस आयुक्तांच्या क्वीन्स गार्डन परिसरातील बंगल्यात आला. बंगल्याच्या प्रवेश द्वाराजवळ सुरक्षा यंत्रणेतील पाेलीस कर्मचारी तैनात होते. मोटारीतून आलेल्या भिसेला त्यांनी अडविले. त्याला आत जाण्यास मनाई केली. त्यानंतर त्याने भरधाव मोटारीने बंगल्याच्या प्रवेशद्वाराला धडक दिली. मोटार वेगाने येत असल्याचे पाहून पोलीस कर्मचारी बाजूला पळाले.
Pune Police Crime News मोटारीच्या धडकेत प्रवेशद्वाराचे नुकसान झाले. पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी भिसे याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी अमोल भिसे याने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भिसे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा त्याने रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.






















