Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

CA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे

CA Anuj Goyal Pune

सीए अनुज गोयल यांचे प्रतिपादन

marathinews24.com

पुणे – CA Anuj Goyal Pune : भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी सनदी लेखापाल महत्त्वाचे योगदान देतातच; पण अलिकडच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेतही ते महत्त्वाचे योगदान देत आहेत. भारतातील एक लाखांहून अधिक सीए जागतिक अर्थ व्यवस्थेसाठी कार्यरत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन ‘आयसीएआय’च्या मेंबर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस कमिटीचे अध्यक्ष सीए डॉ. अनुज गोयल यांनी केले.

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी), ‘आयसीएआय’ पुणे शाखा व झी बिझनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयसीएआय सीएफओ फोरम एलेव्हेट २.०’मध्ये ते बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल ग्रँड शेरेटॉन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, CA Anuj Goyal Pune ‘सीएमआयबी’च्या उपाध्यक्ष सीए प्रिती सावला, विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, उपाध्यक्ष सीए निलेश येवलेकर, सचिव सीए नेहा फडके, खजिनदार सीए नंदकुमार कदम, ‘विकासा’ अध्यक्षा सीए सारिका दिंडोकार, कार्यकारिणी सदस्य सीए सचिन मिनीयार, सीए प्रज्ञा बंब उपस्थित होते.

सीए अनुज गोयल म्हणाले, “कंपनीचा मुख्य वित्त अधिकारी म्हणून काम करत असताना तुमच्याकडे केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान असून उपयोग नसतो. तर इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे काही किमान कौशल्येही असणे आवश्यक असते. उद्योग आणि व्यवसायात सक्रियपणे काम करणाऱ्या सनदी लेखापालांमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगांचे अर्थकारण स्थिर होत असून, ते प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय सीए कौशल्याधारित व प्रात्यक्षिक शिक्षण घेत असल्याने त्यांचे विशेष महत्व आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “गेल्या काही वर्षात बाह्य वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. त्यामुळे काम करताना अंतर्गत अडचणींपेक्षा बाह्य अडचणी वाढत आहेत. जागतिक स्तरावरील अर्थिक बदलांचा विचार करता भारतीय सीए दर्जेदार सेवा देण्याचा कायम प्रयत्न करतात.” आयसीएआयतर्फे नव्याने सीए होत असलेले विद्यार्थी आणि सभासदांसाठी आपण विविध कार्यक्रम, तसेच प्रशिक्षण कार्यशाळा घेत असल्याचेही चितळे यांनी नमूद केले.

सीए प्रिती सावला म्हणाल्या, “पुणे हे शिक्षण, आयटी आणि व्यवसायाचे हब आहे. पुण्यातील सीएंची संख्या लक्षणीय असून पूर्वी सीएचे काम हे केवळ ऑडीटपुरतेच मर्यादित होते. आता मात्र सीए इन्व्हेस्टमेंट बँकींग, रिसर्च अनालिस्ट, अकाऊंटींग अशा सगळ्याच गोष्टी पाहतात. त्यामुळे सीएचा रोल गेल्या काही वर्षात बदलला आहे. सीए हे अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे सीएने कामातील नैतिकता आणि प्रामाणिकता जपायला हवी.”

‘बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताचा आर्थिक दृष्टिकोन आणि कॉर्पोरेट इंडियामध्ये त्याचा उपयोग’ या विषयावर पिरामल एंटरप्रायजेस लिमिटेडचे देबोपाम चौधरी यांनी विचार मांडले. तर ‘गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजाराची भविष्यातील वाटचाल’ या विषयावर सेठी फिनमार्टचे व्यवस्थापकीय संचालक विकास सेठी विचार मांडले. सीए प्रणव आपटे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील संकल्पना, तसेच पुणे शाखेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. गीतांजली माथुर व सौरभ मानचंदा यांनी सूत्रसंचालन केले. सीए नेहा फडके यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×