Breking News
Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालतPune Police Crime News : दारुच्या नशेत पुणे पोलीस आयुक्ताच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्नAhilyadevi Holkar Karj Mukti Yojana : कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाPune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्रीPune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Mercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mercedes Benz Electric GLC Chakan

‘मेक इन महाराष्ट्र’कडून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’कडे वाटचाल; चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

marathinews24.com

पुणे – Mercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’पासून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’पर्यंतची वाटचाल करताना उत्पादनासोबत संशोधन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, मर्सिडीज-बेन्झ ग्रुप एजीचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ. ओला कँलेनिअस, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर, पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर, कंपनीचे जागतिक व भारतीय अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे विकसित झाले असून, देशातील एकूण मोटार वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. राज्याचे उद्दिष्ट केवळ वाहन उत्पादनापुरते मर्यादित नसून इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर, डिझाइन आणि संशोधन-विकास या क्षेत्रांतही जागतिक नेतृत्व मिळविण्याचे आहे. मर्सिडीज-बेंझने चाकणमधून भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई आणि जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादन करावे तसेच भविष्यातील बॅटरी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि मोबिलिटी संशोधनासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन

राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामार्गांवरील जलद चार्जिंग सुविधा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरील शाश्वत मोबिलिटी कॉरिडॉर तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. भविष्यातील वाहन हे केवळ चार चाकांवर धावणारे वाहन नसून संगणक, ऊर्जा प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमतेसह मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे एकत्रित स्वरूप असेल. या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र सज्ज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार

Mercedes Benz Electric GLC Chakan नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित पुणे-पुरंदर विमानतळ आणि वाढवण बंदर यामुळे महाराष्ट्राची जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार आहे. मोठी बाजारपेठ, उत्पादन परिसंस्था, कुशल अभियंते आणि तंत्रज्ञानाच्या बळावर राज्य गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाबाबत अवघ्या ३६ तासांत सुमारे ६५० ग्राहकांनी स्वारस्य दाखविल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रातून जगासाठी उत्पादन, संशोधन आणि नवकल्पना विकसित होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मर्सिडीज-बेंझची ३ हजार २०० कोटींची गुंतवणूक

मर्सिडीज-बेंझच्या चाकण प्रकल्पातून सुमारे १ हजार २०० जणांना थेट रोजगार मिळाला असून, पुरवठादार आणि सेवा क्षेत्रासह सुमारे १८ हजार व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणानंतर दहा वर्षातच या प्रकल्पातून अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे उत्पादन सुरू होणे ही राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीची साक्ष असल्याचे फडणवीस म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतून पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मर्सिडीज-बेंझ कंपनीचे गेल्या तीन दशकांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाचा प्रारंभ हा राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विद्युत ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणपूरक उत्पादन तंत्रज्ञानाचा संगम असलेली ही निर्मिती पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे दर्शवते. पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भविष्यातील वाहतूक क्षेत्रात सक्षम करण्याचे स्व. अजित पवार यांचे स्वप्न साकार होत आहे.

आधुनिक मोबिलिटी तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असून, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला पूरक आहे. महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत जलसंधारण, भूजल संशोधन आणि जलसुरक्षेसाठी जागतिक उद्योग समूहांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुण्याच्या पालकमंत्री म्हणून उद्योग क्षेत्रातील सर्व घटकांना पूर्ण सहकार्य राहील. उद्योगांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर,मर्सिडीज-बेन्झ ग्रुप एजीचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ. ओला कँलेनिअस, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर यांनी प्रास्ताविकातून कंपनीची गेल्या तीस वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. शासनाचे उत्तम सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×