Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune Viman Nagar Drug Seizure : पुण्यात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानातून ई-सिगारेट, हुक्का अन् गांजाची विक्री

Pune Viman Nagar Drug Seizure

विमाननगरमधील ‘क्लाऊड कार्टेलवर छापा; तरुणीला अटक

marathinews24.com

पुणे – Pune Viman Nagar Drug Seizure : कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानाच्या आडून ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री करणाऱ्या तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. ‘क्लाऊड कार्टेल’ या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर, १३० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा २ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभिलाषा पंकज अहिरराव (वय २२, रा. विमाननगर) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित – सविस्तर बातमी 

ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती अंमलदार हरीप्रसाद पुंडे आणि लालू करहे यांना मिळाली होती. त्यानुसार ३ नोव्हेंबरला पथकाने विमान नगरमधील ‘क्लाऊड कार्टेल येथे छापा टाकला. या कारवाई दरम्यान दुकानात तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटार सायकलच्या डिक्कीत ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, १३० ग्रॅम गांजा आढळून आला.

मोबाइलवरून ऑर्डर अन अमली पदार्थांची विक्री

तरुणी मोबाइलवरून ऑर्डर घेऊन प्रतिबंधित वस्तूंची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. विमाननगर परिसरातील आयटी कंपन्या, मोठी महाविद्यालये आणि तरुण वर्गाला लक्ष्य करून हा व्यवसाय सुरू केला होता. यापूर्वी तिने डेक्कन परिसरातील दुकान बंद करून ‘क्लाऊड कार्टेल’ या नावाने कॉस्मेटिक ज्वेलरीचे दुकान सुरू केले होते. दुकानाच्या आडून ती अवैध व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ आणि सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन अधिनियम, २००३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×