Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध केला गर्भपात, पुण्यात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Pune Birthday Dispute Attack

पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Police News : पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे (मांजरी पोलीस ठाणे) यांना निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले आहेत. ही घटना २३ मे २०२५ रोजी वाघोली परिसरात घडली आहे. संबंधित उपनिरीक्षकाच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यानुसार प्राप्त अहवालानुसार त्यांना निलंबित केले आहे.

पुणे जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी करणार्‍यांचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्याविरुद्ध १९ ऑगस्टला मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार केलेल्या चौकशीत २३ मे २०२५ रोजी टोणे यांनी पत्नीच्या विरुद्ध तिचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा अहवाल २६ ऑक्टोबरला वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाला. दरम्यान, उपनिरीक्षक टोणे हे त्याकालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात करणे, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका टोणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

वडगाव शेरीत घरफोडी, ७४ हजारांचा ऐवज लंपास

Pune Police News बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने असा मिळून ७४ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर कालावधीत वडगाव शेरीतील मारुती मंदीरासमोरील घरात घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबियासह वडगाव शेरीतील गावठाण मध्ये राहायला आहेत. २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर कालावधीत त्यांचे घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ४२ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा मिळून ७४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. तक्रारदार आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभंग तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×