Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Crime News Pune : पुणे जिल्ह्यात जबरी चोरी, घरफोडी करणार्‍यांचा पर्दाफाश

Crime News Pune

१२ गुन्हे उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

marathinews24.com

पुणे – Crime News Pune : जिल्ह्यातील विविध ठिकाणी जबरी चोरी, दरोडा, घरफोडी करणार्‍या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणून, सोन्याचे दागिने, दोन दुचाकी असा मिळून १५ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मोबाइल उर्फ हरी पवार (वय २२ रा. सुगाव भोसे, पंढरपूर) आणि शक्तीमान हुबर्‍या काळे (वय २२ रा माळेगाव, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

ग्रामीण भागातील विविध घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींचा माग काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे १ नोव्हेंबरला इंदापूरच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी घरफोडी, दरोड्यातील आरोपी हे एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचल्यानंतर काही वेळाने दोन दुचाकीवर तिघेजण त्याठिकाणी आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करुन मोबाइल उर्फ हरी पवार याच्यासह अल्वयीनाला ताब्यात घेतले.

दरोडा, जबरी चोरी, ८ घरफोड्या उघडकीस

Crime News Pune आरोपींनी ताब्यातील दुचाकी पंढरपूर व करकंब ठाण्याच्या हद्दीतील चोरल्याची कबुली दिली. तसेच खडकी (ता. दौंड) गावात केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मोबाइलही पोलिसांनी जप्त केला. अधिकच्या तपासात आरोपींनी वडगाव निंबाळकर परिसरातही जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी शक्तीमान काळे याला अटक केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी एक दरोडा, जबरी चोरी, ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून १० तोळे वजनाचे दागिने, दोन दुचाकी, मोबाइल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, अपर अधीक्षक शुभम कुमार, डीवायएसपी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, एपीआय जीवन मोहिते, उपनिरीक्षक मुलाणी, उपनिरीक्षक सुधीर वाळूंज यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील विविध भागात घरफोडीसह जबरी चोरी करणार्‍या आरोपींना अटक केली आहे. त्यांनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाने चांगली कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

– संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×