दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Road Accident News : भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी एका दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पारस सुधीर बोत्रे (वय २८, रा. श्री शिवछत्रपती सोसायटी, नवी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार आर्यन गौरव कऱ्हाडकर (वय १८, रा. कुंबरे हर्मिटेज, डीपी रस्ता, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक कल्पना मेडाबलमेवार यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महावितरणच्या रोहित्राची तोडफोड; ८० किलो तांब्याची तार चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार पारस बोत्रे हे गेल्या महिन्यात कोथरूड परिसरातून निघाले होते. बाह्यवळण मार्गावर वळत असताना समोरुन भरधाव आलेल्या दुचाकीने दुचाकीस्वार बोत्रे यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मेडाबलमेवार तपास करत आहेत.
प्रवासी महिलेस दुखापत प्रकरणी पीएमपी चालकावर गुन्हा
सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात पीएमपी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी महिला जखमी झाली. प्रवासी महिलेला दुखापत झाल्या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याेती मयूर दिघे (वय ३६, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, कात्रज) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड ते बिबवेवाडी या मार्गावरील पीएमपी बस पुणे-सातारा रस्त्याने सोमवारी दुपारी निघाली होती. बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरातील बीआरटी मार्गातून एक महिला निघाली होती. महिला समोर आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पीएमपी बस चालकाने अचानक ब्रेक दाबला. बसमधील चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाली. अचानक ब्रेक दाबल्याने तक्रारदार ज्योती दिघे यांचा चेहरा लोखंडी गजावर आपटला. त्यांचे पाच दात तुटले. दात ओठात शिरल्याने दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.




















