लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Mahavitaran Transformer Theft Pune : महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन ८० किलो तांब्याची तार चोरुन नेल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील कोलवडी गावात घडली. तोडफोडीत रोहित्राचे नुकसान झाले असून, त्यातील २०० लिटर ऑईल सांडले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणमधील कर्मचारी रमाकांत ओंकार सुरकुटे (वय ३८, रा. केसनंद, पुणे अहिल्यानगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिस्तूल बाळगणारा महाविद्यालयीन तरुण गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद भागातील कोलवडी गावात महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड करुन ८० किलो तांब्याची तार चोरुन नेली. तोडफोडीत रोहित्रातील २०० लिटर ऑईल सांडले. रोहित्राची तोडफोड केल्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाला. मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी रोहित्राची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार थोरवे तपास करत आहेत.
पुणे शहराजवळील ग्रामीण भागात विशेषत: लोणीकंद, वाघोली, मांजरी, लोणी काळभोर परिससरात महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरटे रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरल्यानंतर त्याची विक्री भंगार व्यावसायिकांना विक्री करतात. वाघोली पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला अटक केली होती. रोहित्राची तोडफोड केल्यानंतर वीजपुरवठा खंडीत होतो. चोरटे निर्जन भागातील रोहित्राची तोडफोड करतात. वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेतीला पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही.




















