Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pune Police Crime News : पिस्तूल बाळगणारा महाविद्यालयीन तरुण गजाआड

Pune Police Crime News

भारती विद्यापीठ आणि लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Police Crime News : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस जप्त करण्यात आले. कुणाल भागवत शेटे (वय २३, सध्या रा. पंचम प्राईड, आंबेगाव, मूळ रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी कुणाल हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी संग्राम पवार, अभिनय चौधरी यांना मिळाली.

कोरेगाव पार्कमधील प्लंज पबवर कारवाई; ८ दिवस बंद ठेवण्याचे आदेश – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या पथकाने आंबेगाव बुद्रुक परिसरात सापळा लावला. कुणाल सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. त्याने पिस्तूल का बाळगले ?,तसेच त्याने कोणाकडून पिस्तूल खरेदी केले ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक रंगराव पवार, संतोष जाधव, उपनिरीक्षक अमित सुर्वे, सचिन सरपाले, नीलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड यांनी ही कामगिरी केली.

एमपीडीएत पसार झालेला सराईत अटकेत

Pune Police Crime News झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) सराइताविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या एकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी येरवडा परिसरातून अटक केली. निखील मधुकर कांबळे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कांबळे याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सप्टेंबर महिन्यात दिले होते. कांबळे याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार होते. कारवाई केल्यानंतर कांबळे हा पोलिसांसमोर हजर झाला नाही. तो पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

कांबळे याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पसार झालेला कांबळे हा लक्ष्मीनगर भागात मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी राहुल परदेशी, अक्षय शिंदे, किरण भागीत यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कांबळे याला पकडले. पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर कदम, दिलीपकुमार वेडे, सहायक निरीक्षक निखील पवार, दत्तात्रय लिगाडे, मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, श्रीनाथ कांबळे, अमोल वायाळ यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×