Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Plunge Pub Pune Action : कोरेगाव पार्कमधील प्लंज पबवर कारवाई; ८ दिवस बंद ठेवण्याचे आदेश

Plunge Pub Pune Action

उच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

marathinews24.com

पुणे – Plunge Pub Pune Action : शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील नामांकित प्लंज पबवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित पब ८ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कोरेगाव पार्कमधील पब व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे. जितेश मेहता यांच्या नावावर असलेला हा पब रविवारी (दि.१) पहाटे पर्यत सुरू होता. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना माहिती मिळाली. त्यानुसार चौकशी करून प्लंज पब आठ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मैत्रिणीाला भेटायला आला अन जाळ्यात सापडला – सविस्तर बातमी 

रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांसाठी प्लंज पब प्रसिद्ध आहे. रविवारी पहाटे पर्यत नियमांचे उल्लंघन करत व्यवस्थापनाने बेशिस्तपणा केला. याप्रकरणी पबची तक्रार प्राप्त होताच चौकशी करण्यात आली. (Plunge Pub Pune Action) त्यानंतर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, या पबमध्ये नियमांचे उल्लंघन होत असताना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, परिसरात गस्त घालणाऱ्या बिट मार्शल यांना पबमधील नियमबाह्य प्रकारांची माहिती मिळाली नव्हती का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

प्लंज पब व्यवस्थापनाकडून नियमांचे उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणांनी वेळीच कारवाई का केली नाही. याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आठ दिवसांच्या बंदीच्या आदेशामुळे पब व्यवस्थापनाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील काही महिन्यापासून शांत असलेले काही पब व्यावसायिक आता पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून, रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना ऑर्डर सर्व्ह करणे, उच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेचे उल्लंघन करणे, बेशिस्त पध्दतीने वागणे, अशा घटनेमुळे स्थानिक नागरिकाना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी बेशिस्त हॉटेल, पब विरुध्द कारवाई कडक करावी अशी मागणी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×