Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : मैत्रिणीाला भेटायला आला अन जाळ्यात सापडला

Pune Crime News

एमपीडीएतील पसार आरोपीला बेड्या

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : मैत्रिणीाला भेटायला आला अन जाळ्यात सापडला : मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका सराईताला लक्ष्मीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मागील काही दिवसांपासून त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. मात्र, मैत्रिणीला तो भेटण्यासाठी येताच सराईताला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. निखील मधुकर कांबळे (वय २२ रा. लक्ष्मीनगर येरवडा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तेव्हापासून आरोपी कांबळे हा पसार झाला होता.

पिस्‍तुल बाळगणाऱ्याला अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी 

सराईत निखील कांबळे हा येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात राहायला असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार राहूल परदेशी, अक्षय शिंदे, किरण भागीत यांना आरोपी कांबळे हा येरवडा गाडीतळ परिसरात मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, एसीपी सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस निरीक्षक दिलीपकुमार वेडे, एपीआय निखील पवार, एपीआय दत्तात्रय लिगाडे, मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, श्रीनाथ कांबळे, अमोल वायाळ यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×