भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये गावठी कट्टा; २३ वर्षीय तरुणाला अटक
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. कुणाल भागवत माने (वय २३, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे; मूळ रा. कडेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
घरातून बाहेर पडण्याची संधीही न देता फरार आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित धुमाळ यांचे पथक १ नोव्हेंबरला गस्त घालत होते. त्यावेळी अंमलदार सचिन पवार आणि अभिनव चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ कॅम्पसजवळील आंबेगाव बुद्रुक परिसरात आयडिया गॅलक्सी दुकानाच्या फलकाजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या थांबला आहे. Pune Crime News माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित कुणाल माने याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला.
पोलिसांनी हा कट्टा जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीक्षक रंगराव पवार, संतोष जाधव, पोलिस उपनिरीक्षक अमित धुमाळ, पोलिस अंमलदार अभिनव चौधरी, सचिन सरपाले, नीलेश खैरेमोडे, किरण बाटे आणि मंगेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली




















