Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : घरातून बाहेर पडण्याची संधीही न देता फरार आरोपीला बेड्या

Pune Crime News

युनिट तीनची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने कारवाई करत त्याला घरातूनच ताब्यात घेतले. आरोपी घराबाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला कोणतीही चाहूल लागू न देता पकडले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने केली. अभय ऊर्फ अब्या संतोष राचूरकर (वय २५, रा. वडगाव बुद्रुक, बेस्ट स्टॉपजवळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे.

पायल झांबरे मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखा युनिट तीनच्या हद्दीतील फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार पथकातील पोलिस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण आणि योगेश झेंडे हे सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी अभय ऊर्फ अब्या राहत्‍या घरी आला आहे. (Pune Crime News) या माहितीची खातरजमा करून पोलिस आरोपीच्या घराभोवती साध्या वेशात पाळत ठेवण्यात आली. तो घराबाहेर येण्याची वाट न पाहता योग्य संधी साधून पोलिसांनी थेट घरात प्रवेश केला आणि त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, अनुष्का जगदाळे, अमोल काटकर, अमित बोडरे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×