Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Station Masters Association Election : ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी धनंजय चंद्रात्रे बिनविरोध

Station Masters Association Election

देशातील ३४ हजार स्टेशन मास्टरांचे नेतृत्व चंद्रात्रे यांच्याकडे

marathinews24.com

पुणे – Station Masters Association Election : ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी पुण्याचे श्री. धनंजय चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड झाली. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला झालेल्या असोसिएशनच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली. देशभरातील हजारो स्टेशन मास्टर या अधिवेशनात सहभागी झाले होते. चंद्रात्रे यांच्या निवडीमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीची स्थापना – सविस्तर बातमी 

असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते. देशातील सर्व विभाग आणि रेल्वे झोनमधील स्टेशन मास्टर या अधिवेशनात सहभागी होऊन नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करतात. सध्या देशभरात सुमारे ३४ हजार स्टेशन मास्टर कार्यरत असून, त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी ही संघटना कार्यरत आहे. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांनी तब्बल १४ वर्षे संघटनेचे प्रमुखपद भूषविले होते.

रेल्वे गाड्यांची वाढती संख्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढलेला कामाचा ताण, मानसिक तणाव, कामाचे अनियमित स्वरूप आणि प्रशासकीय स्तरावरील विविध अडचणी अशा अनेक आव्हानांना स्टेशन मास्टरांना सामोरे जावे लागत आहे. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांची भरती, कामाचा वाढता ताण, अधिकाऱ्यांकडून होणारी मनमानी आणि किरकोळ कारणांवरून बजावल्या जाणाऱ्या आरोपपत्रांचे प्रश्न यावर संघटनेला प्राधान्याने काम करावे लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून असोसिएशन स्टेशन मास्टरांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याबरोबरच विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी धनंजय चंद्रात्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील स्टेशन मास्टरांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

चंद्रात्रे यांच्या निवडीबद्दल देशभरातील विविध विभाग आणि झोनमधील पदाधिकारी व सदस्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुण्यात आगमन झाल्यानंतर ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे पुणे मंडळ सचिव दिनेश कांबळे आणि अध्यक्ष पुरुषोत्तम सिंग यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×