Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

Pune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंद

Pune Mangalsutra Theft Case

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – Pune Mangalsutra Theft Case : पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढणार्‍या सराईत चोरट्याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. आर्वी गाव, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने चोरीसाठी वापरलेली दुचाकी, मंगळसूत्र असा ३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला २० ऑक्टोबरला सकाळी नऊच्या सुमारास पायी जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. Pune Mangalsutra Theft Case चतुःशृंगी पोलिसांनी सलग १० दिवस औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सूस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. त्यातून आरोपीच्या हालचालींचा माग काढत हडपसर परिसरातून राजाभाऊ राठोड याला ताब्यात घेतले.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल आणि चोरीस गेलेले मंगळसूत्र असा ३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीविरोधात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक शहर आणि सातारा येथे जबरी चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×