Breking News
पुणे : नको ते पाहण्यासाठी तरूणीला वॉशरूममध्ये गाठलेनागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळशहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबायको हरविल्याची तक्रार देणारा नवराच निघाला खुनी, ३ महिन्यांनी झाली खुनाची उकलपुणे : जुन्या भांडणाच्या रागातून दोघा भावडांवर वारपीएमपीएल बसप्रवासात महिलेचे सोन्याचे गंठण चोरलेतडीपार असताना कोयत्यासह फिरणाऱ्या सराईताला अटक…३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरेदेशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससामूहिक बलात्कारातील तिसऱ्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुचाकीस्वार डाॅक्टरला धडक देऊन चिरडणाऱ्या टँकरचालकाला अटक

हडपसर भागात घडला होता अपघात

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार डाॅक्टर तरुणाला धडक देऊन पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली. हडपसर भागात साेमवारी ही घटना घडली होती. पसार झालेल्या टँकरचालकाचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डाॅ. ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. डाॅ. साहू हे मूळचे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. ते हडपसर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेत प्रशिक्षण घेत होते.

अल्पवयीन मुलीची नको ते फोटो-व्हिडिओ केले व्हायरल – सविस्तर बातमी 

डॉ साहू हे हडपसर-सातववाडी रस्त्याने दुचाकीवरुन सोमवारी (२१ एप्रिल) निघाले होते. त्यावेळी पीएमपी थांब्यासमोर दुचाकीस्वार डाॅ. साहू यांना भरधाव टँकरने धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या डाॅ. साहू यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी तुकाराम झुंजार, चंद्रकांत रेजीतवाड यांनी पसार झालेल्या टँकर चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हडपसर-सासवड रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले. चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी माग काढून पोलिसांनी टँकरचालक तळेकरला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top