मदतीऐवजी बँकखात्येच झाले रिकामे
marathinews24.com
पुणे – एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये कार्ड पडल्यामुळे कस्टमर केअरला फोन केल्यानंतर काही क्षणातच संबंधिताच्या खात्यातून तब्बल ५८ हजार रुपये काढण्यात आले. मदतीऐवजी त्यांच्या एटीएमचा गैरवापर करीत चोरट्याने पैसे काढून घेत फसवणुक केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र कोंडीबा गिरमे ( वय ७१, रा. मोहम्मद वाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
राज्यातील बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरमे हे १८ एप्रिलला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रस्त्यावरील चिंतामणीनगरमधील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये पडल्यामुळे गिरमे यांनी तत्काळ संबंधित बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ५८ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गिरमे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे.