Breking News
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ८ लाखांची फसवणूकपुणे : नको ते पाहण्यासाठी तरूणीला वॉशरूममध्ये गाठलेनागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळशहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबायको हरविल्याची तक्रार देणारा नवराच निघाला खुनी, ३ महिन्यांनी झाली खुनाची उकलपुणे : जुन्या भांडणाच्या रागातून दोघा भावडांवर वारपीएमपीएल बसप्रवासात महिलेचे सोन्याचे गंठण चोरलेतडीपार असताना कोयत्यासह फिरणाऱ्या सराईताला अटक…३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरेदेशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पादचारी तरूणाची ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावली

खराडीतील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी घरी चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना २१ एप्रिलला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी राहित अभय सुरते वय ३५ रा. खराडी याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

जंगली महाराज रस्त्यावर सोनसाखळा हिसकावली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित खराडी मध्ये राहायला असून, २१ एप्रिलला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो रस्त्याने पायी चालला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी रोहितच्या गळ्यातील ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. त्याने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक असवले तपास करीत आहेत. दरम्यान, मध्यवर्ती जंगली महाराज रस्त्यावरही अशाच पद्धतीने एकाची सोन्याची चैन हिसकावल्याची घटना घडली आहे.

दुचाकीस्वार चोरटे सुसाट, पोलीस सुस्त

शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरटे सुसाट असून, महिलांनंतर आता तरूणांनाही टागरेट करून लुट केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकाच दिवशी दोन ते तीन सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांसह दागिने चोरून नेले जात आहेत. त्यामुळे पादचारी, महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top