येरवड्यातील इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रेक्टर कंपनीतील घटना
marathinews24.com
पुणे – कंपनीत काम करणार्या नोकरदारांनी कॅम्प्युटर, टॅब, सीपीयू चोरल्याची घटना २८ मार्चला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रेक्टर प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत घडली आहे. चारजणांनी मिळून कंपनीतील ३ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पादचारी तरूणाची ५२ हजारांची सोन्याची चैन हिसकावली – सविस्तर बातमी
आमीर अमानत शेख (रा. पारगेनगर, कोंढवा), करीम शेख (रा. श्रीसाई पीजी वडगाव शेरी), मिनाज शेख (रा. येवलेवाडी), आतिया शेख (रा. युनीटी पार्क रोड, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद उमर खान (वय ३५ रा मलीकनगर, कोंढवा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद खान यांची इंटरनॅशनल इंटेरियर कॉन्ट्रेक्टर प्रायव्हेट लिमीटेड कंपनी असून, त्यामध्ये आरोपी वेगवेगळ्या पदावर कामाला होते. २८ मार्चला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चौघाजणांनी संगणमताने कंपनीतील कॅम्प्युटर, टॅब, सीपीयू चोरल्याची घटना घडली. काही दिवसांनी कंपनीतील साहित्याचे मोजमाप केल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. सीसीटीव्ही फुटेजनुसार कामगारांनीच चोरी केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.