Breking News
बाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावलारिक्षातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री, दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केली कारवाईभरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, गुलटेकडी परिसरातील अपघातदागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले, पुण्यातील रविवार पेठेतील घटनाहाॅर्न वाजविल्याच्या वादातून भाऊ-बहिणीला बेदम मारहाण…मळणी यंत्रात स्कार्फ अडकला, महिलेचे शरीरापासून डोके वेगळेपोलीस खात्याविषयी वादग्रस्त वक्तव्य, आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाईची मागणीबलात्कारातील आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडीशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ८ लाखांची फसवणूकपुणे : नको ते पाहण्यासाठी तरूणीला वॉशरूममध्ये गाठले

पोलीस खात्याविषयी वादग्रस्त वक्तव्य, आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी

पोलीस मित्र संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र पोलीस दलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेकडून केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी निवेदन दिले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची आर्थिक फसवणूक – सविस्तर बातमी

आमदार गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलीस दलाविषयी नुकतेच आक्षेपार्ह वक्तव्य केले. राजकीय नेत्यांचा सभा, आंदोलन, निदर्शनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवतात. बंदोबस्तामुळे राजकीय नेत्यांचे कार्यक्रम सुरळीत पार पाडतात, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पोलीस दलाविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त आहे. काही वेळा पोलीस कामाची वेळ संपल्यानंतर कर्तव्य बजावितात. पोलिसांच्या कामाचे स्वरुप २४ तास असते. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या कामाचे तास जास्त आहेत. करोना संसर्ग काळात पोलिसांनी चोख काम केले. पोलिसांमुळे महाराष्ट्र सुरक्षित आहेत, असे कपोते यांनी निवेदनात नमूद केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top