Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चेंगळ्या बोले कुहू….रस प्यायला ये म्हणलं माय…

चेंगळ्या अन मोगराला नेटीझन्सने घेतले डोक्यावर; सोशल मीडियावर गावरान युट्यूबरांचा धुमाकूळ

Marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर कोण कधी ट्रेडींगमध्ये येईल हे सांगता येत नाही. अशाच दोन जणांना संपुर्ण मार्केट जाम केले आहे. आपल्या गावरान भाषेत त्यांनी नेटीझन्सची मने आकर्षित करून घेतली आहेत. चेंगळ्या बोले कुहू अन रस प्यायला ये म्हटलं माय या दोन वाक्यांनी संपुर्ण इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेडवर राडा घातला आहे. चेंगळ्या आणि मोगरला नेटीझन्सनी डोक्यावर घेतले असून, आता संबंधित युट्यूबरांची हवा डीजेवरही झाली आहे. त्यांनी बोललेल्या वाक्यावर गाणं तयार झाले असून, विविध कार्यक्रमात ते वाजवलेही जात आहे.

इन्स्टाग्रामवर संबंधित मुलगा चेंगळ्या २००८ ही आयडी असून, त्याला तब्बल १ लाख ८६ हजार फॉलोअरर्स आहेत. काही महिन्यांपुर्वीच त्याने सोशल मीडियावर अकाउंट उघडले होते. सुरवातीला काही व्हिडिओ करीत असताना त्याने चेंगळ्या बोले कुहू असं म्हणत व्हिडिओ पोस्ट केला होता. संबंधित पोस्टला नेटीझन्सनी डोक्यावर घेतले. अवघ्या काही दिवसांत त्याला लाखो लोकांनी पाहिल्यानंतर चेंगळ्याला फॉलो करण्यास सुरूवात केली. त्याने केलेले व्हिडिओ लाखो लोकांकडून पाहिले जात असून, आता तो सुप्रसिद्ध युट्यूबर झाला आहे. विविध हॉटेल, दुकानांच्या उदघाटन समारंभाला त्याला बोलावले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी डीजेवर सुद्धा चेंगळ्या बोले कुहू हे गाणं तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच अनेक तरूण-तरूणींसह अभिनेते-अभिनेत्रींकडून चेंगळ्याच्या वाक्याची कॉपी केली जात आहे.

रस प्यायला ये म्हणलं माय या वाक्याने तर संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक नेटकर्‍यांकडून एकमेकांना संबंधित आवाजातील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर मोगरा नावाने फेमस झालेल्या व्यक्तीने काही महिन्यांपासून व्हिडिओ पोस्ट केले होते. दरम्यान, प्रचंड उन लागत असल्यामुळे एका रसाच्या गाड्यावर भरलेला ग्लास हातात घेउन रस प्यायला ये म्हणलं माय असे मोगाराने म्हटले आहे. नेमके तेच वाक्य पकडून नेटकर्‍यांनी मोगराला व्हायरल केले आहे. सोशल मीडियासह तमाशा, नाट्य, छोट्या-मोठ्या कार्यक्रमातही आवडीने हे शब्द डीजेवर वाजविले जात आहेत. अवघ्या काही महिन्यांत मोगराच्या फॉलोअर्समध्ये घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या जमान्यात ना तुमचा चेहरा पाहिला जातो, ना तुमचा आवाज, फक्त शब्दांची जाणू अन जुळून आलेलं टायमिंग हे लाखो नेटीझन्सच्या हदयाचा धाव घेत असल्याचे दिसून आले आहे.

चेंगळ्याची स्टाईल अन मोगराचा आवाज

डायलॉग पुर्ण झाल्यानंतर संबंधित तरूणाकडून चेंगळ्या बोले कुहू अस म्हणतानाच उजव्या हाताची दोन बोट उचलून अ‍ॅक्शन केली जात आहे. त्यानुसार नेटकर्‍यांनी शेकडो कमेंट्स अन लाईक्सचा पाउस पाडून चेंगळ्याला फेमस केले आहे. तर मागील अनेक महिन्यांपासून मोगरा, मोगरा असं म्हणत संबंधित युट्यूबरने व्हिडिओंचा धडाका सुरू केला होता. त्यातच रस पिण्याआधी त्याने रस प्यायला ये म्हणलं माय अशा घोगर्‍या आवाजातील डायलॉगला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे चेंगळ्याची स्टाईल अन मोगराचा आवाज महाराष्ट्रात घुमत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×