Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यू

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे बळी

marathinews24.com

पुणे – विषारी दारु पिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १६ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दापोडीच्या फुगेवाडीतील सात जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने फुगेवाडीवर शोककळा पसरली आहे.

कौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१), अकबर पठाण (वय ५२), आनंद पांडुरंग देसाई (वय ६०), आनंद काशीनाथ निकाळजे (वय ७०, सर्व रा. फुगेवाडी) यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. त्यांपैकी चार जणांचा विषारी दारु पिल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्याच्या उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्कमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमातील एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. पुणे शहरातील हडपसर तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला कठोर कारवाई करून या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सखोल चौकशी करून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती नियमानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्याची मागणी

आमदार अमित गोरखे यांनी फुगेवाडी परिसरातील बाधित भागाला प्रत्यक्ष भेट दिली. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी आम्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा धीर त्यांनी दिला. जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×