Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

कौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीला

पोलिसांकडून पती अटकेत

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, खडकी बाजार पोलीस वसाहतीत ही घटना घडली.

जणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग – सविस्तर बातमी

याप्रकरणी योगेश माधव बेरी (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सहायक पोलीस निरीक्षक महिला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) नियुक्तीस आहेत. आरोपी बेरी हा खासगी कंपनीत नोकरी करत आहे. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. गेल्या काही महिन्यांपासून आराेपी पती महिला पाेलीस अधिकाऱ्याच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता.

महिला पोलीस अधिकारी खडकी बाजार पोलीस वसाहतीतील अधिकारी निवासस्थानात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोपी पती वेगळा राहत होता. त्याच्याकडे वसाहतीतील घराची चावी होती. एक चावी महिला अधिकाऱ्याकडे होती. २७ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिला पोलीस अधिकारी घरी परतल्या. आरोपी पती घरात लपून बसला होता. तेव्हा आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याच्य डोळ्यात राख फेकली. ओढणीने त्यांचा गळा आवळला. महिला पोलीस अधिकाऱ्याने आरडाओरडा केला. तेव्हा वसाहतीतील रहिवाशांनी तेथे धाव घेतली. रहिवाशांनी मध्यस्थी करुन पतीला पकडले. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे तपास आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×