Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

जणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग

महिलेसह तिच्या मुलाला धक्काबुक्की

marathinews24.com

पुणे – जनगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. महिलेच्या मुलाला दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास नवनाथ मोरे (वय ४०), क्रांती विकास मोरे (वय ३६), मुक्ता राजभाऊ कसबे (वय ४३), लिलावती नवनाथ मोरे (वय ६५), अभिजित श्रीधर मोरे (वय २६, सर्व रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला कर्मचाऱ्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’- मकरंद टिल्लू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कर्मचारी २७ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वसाहतीतील गल्ली क्रमांक १४ येथे आरोपीच्या घरात त्या गेल्या. आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांची त्यांनी माहिती घेतली.महिलेबरोबर त्यांचा मुलगा होता. आरोपीचे वसाहतीत आणखी एक घर आहे. आरोपीने दुसऱ्या घरातील सदस्यांची नोंद करा, असे सांगितले. तेव्हा महिला कर्मचाऱ्याने त्या घराची नोंद झाली नसल्याचे त्यंना सांगितले. या कारणावरुन आरोपींनी महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून शिवीगाळ केली.

त्यानंतर जनगणनेच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी त्या गुरुवारी (२८ मे) दुपारी बाराच्या सुमारास गेल्या. आदल्या दि‌वशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने महिला आणि मुलाला शिवीगाळ केली. त्यांना मारहाण केली. महिला कर्मचाऱ्याच्या मुलाला दगडाने मारहाण केली. विनयभंग, तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×