लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
marathinews24.com
पुणे – एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील महसूल अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अक्षय शिवाजी कोल्हे (वय २८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष – सविस्तर बातमी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम, तसेच पाईपलाईनची परवानगी मिळावी, यासाठी तक्रारदाराने लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयात अर्ज केला. तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय कोल्हे यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने तडजोडीत एक लाख रुपये लाच देण्योाचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या महिन्यात २ एप्रिल रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करत आहेत.






















