Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष

हडपसर-काळेपडळ परिसरातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

marathinews24.com

पुणे – पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, तसेच हडपसर भागात विषारी दारू प्याल्यानंतर १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘पोलिसांनी पानटपऱ्या, खाद्यपदार्थ विक्री गाड्यांवर कारवाई केली. मात्र, हडपसरमधील गावठी दारू धंद्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली’, असा आरोप हडपसर परिसरातील नागरिकांनी केला.

आयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी – सविस्तर बातमी

हडपसर भागातील राहुल शरद क्षीरसागर (वय ४५), विजय भुकुरलाल शर्मा (वय ४५, दोघे रा. पांढरे मळा, ससाणेनगर, हडपसर), अरूण डाडर, अशोक रमेश चव्हाण (दोघे रा काळेपडळ, हडपसर) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिंपरीतील फुगेवाडीतील ७ जण, तसेच हडपसरमधील चौघांचा मृत्यू झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील १२ जणांचा मृत्यू झाल्यचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. मृत्युमुखी पडलेल्या १२ जणांचा विषारी दारू प्याल्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.पुणे, पिंपरी-पोलीस, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी रात्री दहापूर्वी शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या, तसेच पानटपऱ्या रात्री दहा वाजण्यापूर्वी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हडपसर परिसरात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या गावठी दारू (हातभट्टी) अवैध व्यवसाय पोलिसांना कसा दिसला नाही’, असा संतप्त सवाल हडपसर परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला.
‘अवैध दारू विक्री करणाऱ्या धंदेवाल्यांकडून पोलिसांना दरमहा हप्ता दिला जात आहे. हडपसर, लोणी काळभोर, थेऊर फाटा परिसरात गावठी दारू तायार केली जाते. दारू तयार करण्यासाठी घातक रासायनिक पदार्थांचा वापर केला जात आहे. पोलिसांकडून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई देखाव्यापुरती असते’, असा आरोप हडपसर-काळेपडळमधील नागरिकांनी केला आहे.

‘मिथेनाॅलमुळे मृत्यू झाल्याचा संशय ?

संशयास्पद मृत्यू प्रकरणात रुग्णांना चक्कर येते, श्वास घेण्यास त्रास होता, तोंडातून फेस येतो, धूसर दिसते, गुंगी येत, छातीत दुखणे, हद्याचे ठेके मंदावतात, अशी लक्षणे दिसून आली आहे. मिथेनाॅलमुळे तीव्र स्वरुपाची विषबाधा झाल्यानंतर रुग्णांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. मिथेनाॅलमुळे विषबाधा झाल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ससून रुग्णालयात चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला होता. तीन रुग्णांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. छातीत वेदना, तसेच श्वास घेण्यास अडचण येत होती. दोन रुग्णांना त्वरीत ‘सीपीआर’ देण्यात अलाा. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एका रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाले होते. चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूमागचे कारण शोधण्यासाठी प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती ससून रूग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

ससून रूग्णालयात चौघांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांना दाखल केल्यानंतर दीड तासांत त्यांचा मृत्यू झाला. चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूमागचे कारण शोधण्यासाठी प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात आले आहेत.

– डाॅ. यल्लप्पा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रूग्णालय

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×