Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकी

विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकी

विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विमानतळावरील अधिकारी विशालकुमार श्रीवास्तव (वय ३०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

डोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (२९ मे) सकाळी पावणेसातच्या सुमारास गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाची नियमित तपासणी करण्यात आली. विमानातील प्रसाघनगृहाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्रसाधनगृहात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीवर ठळक अक्षरात बाॅम्ब असे लिहिले हाेते. त्यानंतर त्वरीत सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तपासणीत विमानातील प्रसाघनृहात बाॅम्बसदृश वस्तू सापडली नाही. या घटनेमुळे गुवाहाटीला जाणाऱ्या विमनास काही काळ विलंब झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गुंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×